

बारामती ज्येष्ठ नागरिक निवास
कै. रघुनाथ गेनबा बोरावके
चॅरिटेबल ट्रस्ट (वृद्धाश्रम)
रजि. नंबर - इ १४४४/ १९९१ IT exemption No. Pn/CIT-III/Tech/80G/445/2012-13/1830 dt. 31/01/2013
पूर्ण पत्ता- बारामती ज्येष्ठ नागरिक निवास कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट तांदुळवाडी, ता. बारामती, जि. पुणे
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास हे एक वृद्धाश्रम नव्हे तर एक आधार , समाधान आणि प्रेम देणाऱ्या भिंती.
आम्हाला माहित आहे की ज्येष्ठ होणे कठीण आहे, म्हणूनच आम्ही सर्व वयोगटातील ज्येष्ठांसाठी सुरक्षित आणि आरामदायी घर देण्यासाठी आलो आहोत. आमचे वृद्धाश्रम सहाय्यक राहण्यापासून पूर्ण केअरपर्यंत अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करते, जेणेकरून तुम्ही खात्री बाळगू शकता की तुमची प्रिय व्यक्तीची सर्वोत्तम काळजी घेण्यात येत आहे. आम्ही समजतो की वृद्धाश्रमात राहणे स्वतःची अनोखी आव्हाने सादर करू शकते, परंतु आमचे रहिवासी त्यांच्या नंतरच्या काळात आरामदायी, निरोगी आणि आनंदी राहू शकतील याची खात्री करण्यासाठी आम्ही येथे आहोत. आमचे कर्मचारी आमच्या रहिवाशांना शक्य तितक्या चांगल्या दर्जाचे जीवन देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
आमच्याबद्दल माहिती
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास हे एक नॉन- प्रॉफिटेबल ट्रस्ट आहे. बारामती गावापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावाशेजारी प्रदूषणमुक्त, हवेशीर, सुंदर अशी ३ एकर जागा आहे. तसेच संपूर्ण परिसर वृक्षवेलींनी सुशोभित वॉल कंपाउंड, अंतर्गत जॉगिंग ट्रॅक, परसबागेमध्ये समाविष्ट आहे.
आमच्या कडे ज्येष्ठ नागरिकांना निवासासाठी १५ बंगले असून त्यात ३० रूम ची सोय केली आहे. प्रत्येक रूम मध्ये २ वृद्धांची सोय केली जाते. या प्रत्येक रूम मध्ये सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोडसह उत्तम सोय आहे.
तसेच ८ स्पेशल बंगले असून त्यात १६ रूम ची सोय केली आहे. या प्रत्येक रूम मध्ये हवेशीर गार्डन साईडला व्हरांडा, सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोड, छोटेसे किचन, फर्निचर, टीव्ही आणि फ्रिज ची उत्तम सोय आहे.
आमच्या सेवा
आमच्या वृद्धाश्रमात, आम्ही आमच्या वृद्ध रहिवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आश्वासक वातावरण प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. आम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी, निरोगी आणि घरगुती वाटण्यास मदत करत आहोत. आम्ही येथे घरापेक्षा जास्त सुखसोयी मिळाव्या हेच प्रयत्न करत आहोत .

कर्मचारी व डॉक्टर 24/7 उपलब्ध

अंतर्गत जॉगिंग ट्रॅक

चविष्ट घरगुती नाश्ता

चविष्ट घरगुती जेवण

गणेश मंदिर

वृक्षवल्ली आणि विश्रांतीसाठी कॅनॉपी

हॉस्पिटल

वाचनालय

बैठ्या खेळाची सुविधा

सुंदर बाग

डोळ्यांची टेस्टिंग व फ्री मोतीबिंदू ऑपरेशन

प्रशस्त ज्ञानमंदिर व ध्यानमंदिर

स्वागतकक्ष
किंमती
आमच्या कडे ज्येष्ठ नागरिकांना निवासासाठी १५ बंगले असून त्यात ३० रूम ची सोय केली आहे. प्रत्येक रूम मध्ये २ वृद्धांची सोय केली जाते.
बेसिक रूम
1. सर्व सुख-सोयी निवासी फी फक्त ६०००/- रु. दरमहा.
2. आमच्याकडे सेपरेट रूम सुद्धा शक्य आहे तेही फक्त ९०००/- रु. फी मध्ये.
3. डिपॉझिट फक्त १००००/- रु.
4. प्रत्येक रूम मध्ये सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोडची उत्तम सोय आहे.
5. प्रत्येक नातेवाईक गेस्ट साठी एका दिवसाचे फक्त ५००/- रु. (मध्ये नाष्टा + जेवण उपलब्ध आहे).
स्पेशल रूम
1. सर्व सुख-सोयी आणि अतिरिक्त सुविधा निवासी फी फक्त ९०००/- रु. दरमहा
2. सेपरेट रूम निवासी फी फक्त १५०००/- रु. मध्ये उपलब्ध .
3. हवेशीर गार्डन साईडला व्हरांडा, छोटेसे किचन, फर्निचर, टीव्ही, फ्रिज प्रत्येक रूम मध्ये सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोडची उत्तम सोय आहे
4. प्रत्येक नातेवाईक गेस्ट साठी एका दिवसाचे फक्त ७००/- रु. (मध्ये नाष्टा + जेवण उपलब्ध आहे).
प्रवेश नियमावली
प्रत्येक निवासींच्या तब्येतीची आणि आनंदाची काळजी लक्षात घेऊन खालील नियमावली बनवण्यात आली आहे.
- संस्थेत प्रवेश देतेवेळी महिलांचे वय ५५ व पुरुषांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त असावे. प्रवेशाचे सर्व हक्क विश्वस्तांच्या स्वाधीन राहतील.
- दैनंदिन स्वतःची कामे व स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम असणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
- संस्थेत प्रवेश घेते वेळी निवासी व नातेवाईक यांच्या आधार कार्डची झेरॉक्स जमा करावी लागेल व निवासींचा फोटो असणे आवश्यक आहे
- संस्थेत प्रवेश घेतेवेळी निवासीन सोबत त्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष सही करण्यास उपस्थित असणे बंधनकारक आहे. नातेवाईक प्रत्यक्ष उपस्थित नसल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
- सुरुवातीस फक्त १ महिन्याकरिताच प्रवेश दिला जाईल. संस्थेस योग्य वाटल्यास कालावधी वाढवता येईल.
- संस्थेत कमीत कमी पंधरा दिवसांसाठी प्रवेश घ्यावा लागेल व त्यासाठी अनामत रक्कम भरावी लागेल.
- पंधरा दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर प्रति दिवसाप्रमाणे चार्जेस लागतील
- प्रवेशाचे अगोदर संस्थेच्या मेडीकल ऑफीसरकडून तपासणी करुन घेणे जरुरीचे आहे. नंतरच प्रवेश निश्चिती केली जाईल.
- नॉन ए.सी निवासी खोल्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून अनामत रक्कम रु. 10000/- बिनव्याजी पुर्ण द्यावे लागतील. शेअरिंग मध्ये निवासी वर्गणी रु.6000/- प्रवेश देण्या अगोदर भरावे लागतील / दरमहा 5 तारखे पर्यंत निवासी वर्गणी भरावी लागेल. यामध्ये वाढ करण्याचा अधिकार संस्था चालकांना राहील. स्वतंत्र खोली घेतल्यास दरमहा रु.9000/- भरावे लागतील. तसेच प्रत्येक नातेवाईक गेस्टसाठी एका दिवसाचे 500/- रु. ( जेवण नाष्टा सहित) द्यावे लागतील.
- स्पेशल सूट एसी रूम निवासी खोल्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून अनामत रक्कम रु.15000/- बिनव्याजी पुर्ण द्यावे लागतील. शेअरिंग मध्ये निवासी वर्गणी रु.9000/- प्रवेश देण्या अगोदर भरावे लागतील / दरमहा 5 तारखे पर्यंत निवासी वर्गणी भरावी लागेल.. यामध्ये वाढ करण्याचा अधिकार संस्था चालकांना राहील. स्वतंत्र खोली घेतल्यास दरमहा रु.15000/- भरावे लागतील. तसेच प्रत्येक नातेवाईक गेस्टसाठी एका दिवसाचे रु.700/- (जेवण नाष्टा सहित) द्यावे लागतील.
- संस्थेत 90 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या निवासींना निवासी वर्गणी मध्ये दरमहा 500 रुपये सूट देण्यात येईल.
- संस्थेत सलग मागील 10 वर्षापेक्षा जास्त दिवस राहणाऱ्या निवासींना निवासी वर्गणी मध्ये दरमहा 500 रुपये सूट देण्यात येईल.
- संस्थेतील नॉन एसी रूम मध्ये गिझर लावून हवा असेल तर प्रती निवासी दर महा 500 रुपये जास्तीचे भरावे लागतील.
- प्रत्येक जर कोणाला सुट्टीवर जायचे असेल तरीही त्यांना पूर्ण महिन्याचा निवास खर्च भरावा लागेल.
- प्रत्येकास संस्थेच्या नियमानुसार वागावे लागेल.
- प्रत्येकाने दैंनदिन लागणाऱ्या वस्तू उदा. ब्रश, टूथपेस्ट, तेल, आंघोळीचा साबण, कपडे स्वतःसाठी नेहमी लागणारी औषधे व व्यक्तीगत परंतू इतरांना त्रास न होणारी साधने स्वखर्चाने आणावीत.
- संस्थेच्या जागेत मांसाहार करणे, मादक पदार्थ, अल्कोहोल पिणे, धुम्रपान करणे इत्यादी कृत्यास सक्त मनाई आहे.
- स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःजवळ पैसे दागदागिने ठेवण्यास परवानगी राहील. परंतू त्याची चोरी झालेस अथवा हरवल्यास त्यास संस्था जबाबदार राहणार नाही. शक्यतो स्वतःजवळ मौल्यवान वस्तू व गरजेपेक्षा जास्त पैसे ठेवू नयेत.
- सकाळी ७ वा. चहा, ९ वा. चहा व नाष्टा, दुपारी १२.३० वा. भोजन, सायंकाळी ४.३० वा. चहा व बिस्कीटे व रात्री ७.३० वा. भोजन दिले जाईल. त्याशिवाय जास्तीचे काही लागल्यास त्याचा ज्यादा खर्च त्या व्यक्तीस करावा लागेल. प्रासंगिक कारणासाठी वरील वेळांमध्ये बदल होऊ शकतात.
- स्वत: आपली खोली, बाथरूम व परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे.
- स्वतःची करमणुकीची साधने वापरावयाची असल्यास तशी संस्थेची पूर्वपरवानगी घेणे जरूरीचे आहे. करमणुकीच्या साधनाचे वापरामुळे संस्थेतील इतरांना त्रास होत आहे असे आढळलेस त्याची परवानगी रद्द करण्यात येईल. करमणूक साधनाचे (टी.व्ही) चे लाईट बील वेगळे दरमहा रु.200/ प्रति महिना आकारले जाईल.
- कपडे धुण्यासाठी प्रतिव्यक्ती रु. 200/- प्रति महिना आकारले जाईल.
- चहा , नाश्ता व जेवण यांच्या रूम सर्व्हिस साठी रु. 300/- प्रति महिना आकारले जाईल.
- संस्था चालक / व्यवस्थापक यांच्या पूर्व परवानगीशिवाय कोणालाही बाहेर जाता येणार नाही. अथवा परगावी जाता येणार नाही. परस्पर कोणी परगावी अथवा बाहेर गेला व त्यांच्या जीविताला नैसर्गिकरित्या अथवा इतर काही कारणाने त्रास अथवा अपाय झाल्यास संस्था त्यास जबाबदार राहणार नाही.
- बाहेरगावी जावयाचे असल्यास रूमची चावी व्यवस्थापकडे द्यावी.
- आजारपणात तत्संबंधी मेडीकल तपासण्या करून घेणे, तज्ञांचा सल्ला घेणे तसेच लागणारी औषधे याचा खर्च सदरील व्यक्तीने करावयाचा आहे यामध्ये संस्था त्यांना आपलेपणाने सेवाभावे सहकार्य राहील.
- जर एखाद्या ज्येष्ठास मोठ्या आजाराकरीता खाजगी दवाखान्यात अॅडमिट करावे लागले अथवा मयत झालेस त्यांच्या नातेवाईकांना त्वरीत कळविण्यास प्रयत्न केला जाईल. जर नातेवाईक योग्य वेळेत न आल्यास त्याचेवर संस्था विहित खर्च करील व त्याचे अनामत रकमेतून तो वजा करून घेईल.
- निवास सोडल्यानंतर निवासी डिपॉझिट रिटर्नचा धनादेश आठ दिवसात परत देण्याचा संस्था प्रयत्न करेल
- संस्थेत राहणाऱ्या निवासीचे वर्तणूक व्यवस्थित नसल्यास किंवा इतर निवासी व संस्थेतील कर्मचारी यांना त्रासदायक होत असल्यास संस्था आपल्याला त्वरित कळवेल व आपल्याला सदर निवासी यांना घरी घेऊन जावे लागेल.
- वरील सर्व नियमांचे पालन करणाऱ्या ज्येष्ठांस संस्थेत रहाण्याची अनुमती दिली जाईल. अन्यथा आठ दिवस अगोदर सुचना देवून संस्थेतून काढून टाकले जाईल.
- नियमावलीत बदल करण्याचा अधिकार संस्थेने स्वतःकडे राखुन ठेवलेला आहे.
- आवश्यकतेनुसार मेडिकल तपासणी सुविधा उपलब्ध आहे.
आमचा संघ
माजी विश्वस्त

संस्थापक अध्यक्ष
कै. जिवाभाई माणिकचंद कोठारी

माजी अध्यक्ष
कै. डॉ. टी. जी. आंबर्डेकर

माजी अध्यक्ष
कै. मुरलीधर घोळवे
विश्वस्त मंडळ

अध्यक्ष
श्री. किशोर मेहता

विश्वस्त व सल्लागार
सौ. सुनेत्रा अजित पवार

उपाध्यक्ष
श्री. राजेंद्र बोरावके

सेक्रेटरी
श्री. फखरूद्दीन अ. कायमखानी

खजिनदार
डॉ. सौ. सुहासिनी सातव

सह खजिनदार
डॉ. अजिंक्य राजेनिंबाळकर

विश्वस्त व आर्किटेक्ट
श्री. अभय शहा

विश्वस्त
श्री. अमित बोरावके

विश्वस्त
डॉ. अजित आंबर्डेकर

विश्वस्त
श्री. सुरेंद्र भोईटे

निमंत्रित विश्वस्त
सौ. योजना किशोर देवळे
व्यवस्थापक

व्यवस्थापक
श्री. गणेश शेळके
उपक्रम

गुडीपाडवा साजरा
करताना संस्थेतील निवासी

निवासी मनोरंजनासाठी प्रोजेक्टर
वर नाटक व सिनेमा

नीलिमा प्रोडक्शन मार्फत
कथक नृत्य निवासी साठी

पद्मश्री डॉक्टर लहाने व त्यांच्या टीम सोबत संस्थेतील निवासी

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांन मार्फत निवासी साठी सांस्कृतिक कार्यक्रम

माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मासिक निवासी सभा

रंग पंचमी साजरी करताना संस्थेतील निवासी

वाढदिवसा निमित्त निवासी कडून शुभेच्छा

संस्थेतील निवासी तर्फे गणेशोत्सव

संस्थेतील महिला गप्पा गोष्टी करताना

संस्थेतील महिला टिव्ही पाहताना
आमच्याशी संपर्क साधा
बारामती ज्येष्ठ नागरिक निवास वृद्धाश्रम ही निवासी सुविधा आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी आणि सहाय्य प्रदान करतात जे यापुढे स्वत: ची काळजी घेऊ शकत नाहीत. आम्ही रहिवाशांना समुदायाची भावना देतो. तुमची काळजी घेण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा.
देणगी संदर्भात
तुमच्या देणगीतून जेष्ठयांची मदत हा हि एक मोठा आधार.
देणगी देण्यास खालील माहिती:-
नाव- बारामती ज्येष्ठ नागरीक निवास
बँक- कॉसमॉस बँक, बारामती ब्रांच
Ac. No. 0141001012865
IFSC : COSB0000014
Bank - Cosmos Bank
Branch - Baramati branch









