बारामती ज्येष्ठ नागरिक निवास
कै. रघुनाथ गेनबा बोरावके
चॅरिटेबल ट्रस्ट (वृद्धाश्रम)

रजि. नंबर - इ १४४४/ १९९१ IT exemption No. Pn/CIT-III/Tech/80G/445/2012-13/1830 dt. 31/01/2013

पूर्ण पत्ता- बारामती ज्येष्ठ नागरिक निवास कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्ट तांदुळवाडी, ता. बारामती, जि. पुणे

बारामती ज्येष्ठ नागरिक निवास हे एक वृद्धाश्रम नव्हे तर एक आधार , समाधान आणि प्रेम देणाऱ्या भिंती.

आम्हाला माहित आहे की ज्येष्ठ होणे कठीण आहे, म्हणूनच आम्ही सर्व वयोगटातील ज्येष्ठांसाठी सुरक्षित आणि आरामदायी घर देण्यासाठी आलो आहोत. आमचे वृद्धाश्रम सहाय्यक राहण्यापासून पूर्ण केअरपर्यंत अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करते, जेणेकरून तुम्ही खात्री बाळगू शकता की तुमची प्रिय व्यक्तीची सर्वोत्तम काळजी घेण्यात येत आहे. आम्ही समजतो की वृद्धाश्रमात राहणे स्वतःची अनोखी आव्हाने सादर करू शकते, परंतु आमचे रहिवासी त्यांच्या नंतरच्या काळात आरामदायी, निरोगी आणि आनंदी राहू शकतील याची खात्री करण्यासाठी आम्ही येथे आहोत. आमचे कर्मचारी आमच्या रहिवाशांना शक्य तितक्या चांगल्या दर्जाचे जीवन देण्यासाठी वचनबद्ध आहेत.





आमच्याबद्दल माहिती

बारामती ज्येष्ठ नागरिक निवास हे एक नॉन- प्रॉफिटेबल ट्रस्ट आहे. बारामती गावापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावाशेजारी प्रदूषणमुक्त, हवेशीर, सुंदर अशी ३ एकर जागा आहे. तसेच संपूर्ण परिसर वृक्षवेलींनी सुशोभित वॉल कंपाउंड, अंतर्गत जॉगिंग ट्रॅक, परसबागेमध्ये समाविष्ट आहे.

आमच्या कडे ज्येष्ठ नागरिकांना निवासासाठी १५ बंगले असून त्यात ३० रूम ची सोय केली आहे. प्रत्येक रूम मध्ये २ वृद्धांची सोय केली जाते. या प्रत्येक रूम मध्ये सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोड आणि इंटरकॉम ची उत्तम सोय आहे.

तसेच ८ स्पेशल बंगले असून त्यात १६ रूम ची सोया केली आहे. या प्रत्येक रूम मध्ये हवेशीर गार्डन साईडला व्हरांडा, सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोड, छोटेसे किचन, फर्निचर, टीव्ही , फ्रिज आणि इंटरकॉम ची उत्तम सोय आहे





आमच्या सेवा

आमच्या वृद्धाश्रमात, आम्ही आमच्या वृद्ध रहिवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आश्वासक वातावरण प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. आम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी, निरोगी आणि घरगुती वाटण्यास मदत करत आहोत. आम्ही येथे घरापेक्षा जास्त सुखसोयी मिळाव्या हेच प्रयत्न करत आहोत .

कर्मचारी व डॉक्टर 24/7 उपलब्ध

अंतर्गत जॉगिंग ट्रॅक

चविष्ट घरगुती नाश्ता

चविष्ट घरगुती जेवण

वृक्षवल्ली आणि विश्रांतीसाठी कॅनॉपी

गणेश मंदिर

हॉस्पिटल

वाचनालय

बैठ्या खेळाची सुविधा

सुंदर बाग

डोळ्यांची टेस्टिंग व फ्री मोतीबिंदू ऑपरेशन

प्रशस्त ज्ञानमंदिर व ध्यानमंदिर

स्वागतकक्ष

भव्य डायनिंग हॉल





किंमती

आमच्या कडे ज्येष्ठ नागरिकांना निवासासाठी १५ बंगले असून त्यात ३० रूम ची सोय केली आहे. प्रत्येक रूम मध्ये २ वृद्धांची सोय केली जाते.

बेसिक रूम

  • सर्व सुख-सोयी निवासी फी फक्त ६०००/- रु. दरमहा
  • आमच्याकडे सेपरेट रूम सुद्धा शक्य आहे तेही फक्त ९०००/- रु. फी मध्ये.
  • डिपॉझिट फक्त १००००/- रु.
  • प्रत्येक रूम मध्ये सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोड आणि इंटरकॉम ची उत्तम सोय आहे.
  • प्रत्येक नातेवाईक गेस्ट साठी एका दिवसाचे फक्त ५००/- रु. मध्ये नाष्टा + जेवण उपलब्ध आहे.
  • स्पेशल रूम

  • सर्व सुख-सोयी आणि अतिरिक्त सुविधा निवासी फी फक्त ९०००/- रु. दरमहा
  • सेपरेट रूम निवासी फी फक्त १५०००/- रु. मध्ये उपलब्ध .
  • हवेशीर गार्डन साईडला व्हरांडा, छोटेसे किचन, फर्निचर, टीव्ही, फ्रिज प्रत्येक रूम मध्ये सेपरेट स्वच्छ बाथरूम + कमोड आणि इंटरकॉम ची उत्तम सोय आहे
  • प्रत्येक नातेवाईक गेस्ट साठी एका दिवसाचे फक्त ७००/- रु. मध्ये नाष्टा + जेवण उपलब्ध आहे.




  • प्रवेश नियमावली

    प्रत्येक निवासींच्या तब्येतीची आणि आनंदाची काळजी लक्षात घेऊन खालील नियमावली बनवण्यात आली आहे.


    1)इथे प्रवेश महिलांना ५५ वयापुढे आणि पुरुषांना ६० वयापुढे उपलब्ध आहे.
    2)सुरवातीस १ महिना फक्त प्रवेश दिला जाईल. संस्थेस योग्य वाटल्यास कालावधी वाढवता येईल.
    3)प्रवेश घेण्याअगोदर संस्थेकडून हेल्थ चेकअप केले जातील.
    4)प्रत्येक निवासीची दरमहा फी ५ तारखे पर्यंत भरता येईल.
    5)सकाळी ७ वा चहा, ९ वा. चहा व नाष्टा, दुपारी १२.३० वा. भोजन, संध्याकाळी ४ वा. चहा व बिस्किटे आणि रात्री ७.३० वा. भोजन दिले जाईल. प्रासंगिक कारणासाठी वरील वेळांमध्ये बदल होऊ शकतो.
    6)आजारपणात तत्संबंधी मेडिकल टेस्ट करून घेणे, डॉक्टर्स चा सल्ला घेणे आणि लागणारी औषधे याचा खर्च सदरील निवासी ने करावा परंतु यामध्ये आमचे पूर्ण सहकार्य राहील.
    7)प्रत्येक निवासीने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
    8)संस्थेच्या जागेत मांसाहार करणे, मादक पदार्थ , धूम्रपान सेवन करण्यास सक्त मनाई आहे.
    9)स्वतः च्या मूल्यवान वस्तूंची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणे आवश्यक आहे. वस्तू हरवल्यास संस्थेची जबाबदारी राहणार नाही.
    10)प्रत्येक निवासीने आपली रूम आणि परिसर स्वछ ठेवण्यास सहकार्य करावे
    11)स्वतःची करमणुकीची साधने ( टीव्ही ) वापरायचा असल्यास दुसर्यांना त्यांचा त्रास होणार नाही याची दक्षता सर्व निवासींनी घ्यावी. अश्या साधनांचे लाईट बिल दरमहा १००/- रु. आकारले जाईल.
    12)पूर्व परवानगी शिवाय ज्येष्ठ नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई आहे. हे त्यांच्या तब्येतीची काळजी करून आकारलेले नियम आहे. परवानगी शिवाय बाहेर गेल्यास काही त्रास किंवा अपाय झाल्यास संस्था जबाबदार राहणार नाही
    13)जर कोणाला मोठ्या आजारासाठी खाजगी दवाखान्यात ऍडमिट करावे लागले अथवा मयत झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना त्वरित कळवण्यात येईल. जर नातेवाईक योग्य वेळेस नाही येऊ शकल्यास त्याचेवर संस्था विहित खर्च करेल आणि त्यांच्या डिपॉझिट मधून तो खर्च वजा केले जातील.
    14)वरील सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा आठ दिवस अगोदर सूचना देऊन त्या निवासीला संस्थेमधून काढून टाकण्यात येईल.
    15)नियमांमध्ये काही बदल करण्याचे आढळल्यास संस्था नियम मध्ये बदल करू शकते.
    16)१५ तारखे अगोदर ज्यांची ऍडमिशन होईल त्यांना पूर्ण महिन्याची फी भरणे अनिवार्य आहे.
    17)जर कोणी सुट्टीवर जाणार असेल तरी पूर्ण महिन्याची फी भरावी लागेल.
    18)प्रत्येकाने रोज लागण्याऱ्या वस्तू उदा. ब्रश, टूथपेस्ट, साबण, तेल, कपडे, औषधे आणि इतर लागणाऱ्या गोष्टी स्वखर्चाने आणाव्यात.
    19)बाहेर गावी जाताना स्वतःच्या आणि संस्थेच्या सर्व वस्तू संस्थेकडे जमा करून रूम ची चावी व्यवस्थापक कडे द्यावे





    आमचा संघ

    संस्थापक अध्यक्ष - कै. जिवाभाई माणिकचंद कोठारी

    माजी अध्यक्ष - कै. डॉ. टी. जी. आंबर्डेकर

    माजी अध्यक्ष - कै. मुरलीधर घोळवे

    उपाध्यक्ष - श्री. राजेंद्र बोरावके

    विश्वस्त व सल्लागार - सौ. सुनेत्रा अजित पवार

    सेक्रेटरी- श्री. किशोर मेहता

    खजिनदार- श्री. फखरुद्दीन कायमखानी

    सहखजिनदार - श्री. अमित बोरावके

    विश्वस्त व आर्किटेक्ट - श्री. अभय शहा

    विश्वस्त- डॉ. अजित आंबर्डेकर

    विश्वस्त - डॉ. सौ. सुहासिनी सातव

    विश्वस्त- श्री. सुरेंद्र भोईटे

    डॉ. अजिंक्य राजे निंबाळकर

    व्यवस्थापक - श्री. गणेश शेळके





    उपक्रम

    गुडीपाडवा साजरा करताना संस्थेतील निवासी

    निवासी मनोरंजनासाठी प्रोजेक्टर वर नाटक व सिनेमा

    नीलिमा प्रोडक्शन मार्फत कथक नृत्य निवासी साठी

    पद्मश्री डॉक्टर लहाने व त्यांच्या टीम सोबत संस्थेतील निवासी

    महाविद्यालयातील विद्यार्थ्यांन मार्फत निवासी साठी सांस्कृतिक कार्यक्रम

    माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

    मासिक निवासी सभा

    रंग पंचमी साजरी करताना संस्थेतील निवासी

    वाढदिवसा निमित्त निवासी कडून शुभेच्छा

    संस्थेतील निवासी तर्फे गणेशोत्सव

    संस्थेतील महिला गप्पा गोष्टी करताना

    संस्थेतील महिला टिव्ही पाहताना





    आमच्याशी संपर्क साधा

    बारामती ज्येष्ठ नागरिक निवास वृद्धाश्रम ही निवासी सुविधा आहे जी ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी आणि सहाय्य प्रदान करतात जे यापुढे स्वत: ची काळजी घेऊ शकत नाहीत. आम्ही रहिवाशांना समुदायाची भावना देतो. तुमची काळजी घेण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा.

    देणगी संदर्भात
    तुमच्या देणगीतून जेष्ठयांची मदत हा हि एक मोठा आधार.

    देणगी देण्यास खालील माहिती:-

    नाव- बारामती ज्येष्ठ नागरीक निवास
    बँक- कॉसमॉस बँक, बारामती ब्रांच
    Acc no- 0140501071789
    Ifsc code- COSB0000014